

must watch movies
ESAKAL
जर तुम्ही सिरियल किलिंग आणि सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल, तर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका जबरदस्त चित्रपटाबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हा असा चित्रपट आहे जो तब्बल १७ अभिनेत्यांनी नाकारला होता आणि २१ निर्मात्यांनी यातून माघार घेतली होती. या चित्रपटात पैसे लावणं अत्यंत 'रिस्की' असल्याचं सर्वांचं मत होतं, परंतु प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटाचं नाव आहे 'रत्सासन' (Ratsasan). या चित्रपटाच्या यशानंतर २०२२ मध्ये अक्षय कुमारने याचा हिंदी रिमेक 'कटपुतली' नावाने केला होता.