चित्रपट संस्कृतीचा मानदंड! २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; कधी आणि कुठे होणार सोहळा?

22ND THIRD EYE ASHIAN FILM FESTIVAL: भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचं आकर्षण ठरणार आहे. मराठी चित्रपट स्पर्धा विभागात अकरा मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत.
22nd third eye ashian film festival

22nd third eye ashian film festival

ESAKAL

Updated on

महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ दिनांक ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई तसेच भारतीय चित्रपटांचा समावेश असून, यंदा एकूण ५६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात निवडलेले हे ५६ चित्रपट प्रभादेवीतील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत. बूसान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या ‘ऑन यूअर लॅप’ (पांगकू) या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com