

seema anand
esakal
सोशल मीडियावर सध्या ६३ वर्षीय सीमा आनंद यांची जोरदार चर्चा आहे. लोकांना टीका करायला काही कारण लागत नाही. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींवर ते टीका करत सुटतात. अशीच टीका सीमा आनंद यांच्यावरही झालीये. शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टवर सीमा यांनी स्त्री पुरुषांचे नातेसंबंध आणि जवळीक यांवर मोकळेपणाने आपलं मत मांडलं. त्यामुळे त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या. इतकंच नाही तर त्यांचे फोटो मॉर्फ करून त्यांचे अश्लील फोटो व्हायरल करण्यात आले. त्यामुळे आता पाणी डोक्यावरून गेल्याने सीमा यांनी यागोष्टीवर स्पष्ट मत मांडत ट्रोलर्सना आरसा दाखवलाय.