
दिग्दर्शक प्रेम यांचा 'केडी– द डेव्हिल' हा चित्रपट आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण करत होता आणि आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित करून या उत्साहाला आणखी बळ दिलं आहे. 1970 च्या दशकाचा काळ उलगडणारा हा टीझर प्रेम यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या अॅक्शनने भरलेल्या गँगस्टर विश्वाची झलक दाखवतो. या टीझरमध्ये ध्रुव सरजा त्यांच्या रॉ अॅक्शन आणि एनर्जीने झळकत आहेत. संजय दत्त ‘ढक देवा’ या भूमिकेत त्यांच्या स्टायलिश स्वॅग आणि दमदार व्यक्तिमत्त्वासह दिसत आहेत.