
चित्रपट निर्माते विजय चौधरी आणि मच्छिंद्र धुमाळ यांच्या श्री गणेश मुव्ही क्रिएशन्स निर्मित आणि रवी निंबाळकर दिग्दर्शित '८७ रुपयांचा शाईचा पेन' या बालचित्रपटाची रशियामधील प्रतिष्ठित "झिरो प्लस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये" 'इंटरनॅशनल फिचर फिल्म' या श्रेणीत निवड झाली आहे. भारतामधून या एकमेव चित्रपटाची निवड झाल्याने, हे यश विशेष अभिमानास्पद ठरले आहे. हा चित्रपट महोत्सव येत्या ऑक्टोबर महिन्यात रशियामधील तैमन या शहरात आयोजित करण्यात येणार आहे.