
हॉरर चित्रपट हा जगभरात लोकप्रिय असलेला प्रकार आहे. मात्र मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रकार फार हाताळला गेलेला नाही. ही उणीव आता "समसारा" हा चित्रपट भरून काढणार असून, दमदार स्टारकास्ट या चित्रपटाचा गूढरम्य टीजर लाँच नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. २० जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.