

मराठी रंगभूमीवर सध्या विविध विषयांवरील नाटकं सुरू आहेत. सगळ्याच प्रकारच्या नाटकांना विशेष पसंती मिळतेय. अशातच एक वेगळा विषय घेऊन 'सुमुख चित्र' निर्मित व 'अनामिका' प्रकाशित एक संगीत, नृत्यनाट्य आणि मनाच्या गाभाऱ्यात खोल शिरकाव करणारं ‘उर्मिलायन’ हे नवं कोरं पौराणिक नाटक १५ डिसेंबरला रंगभूमीवर येत आहे. पुण्यात अण्णाभाऊ साठे नाट्यगृह दुपारी १२.३० वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.