
'दार उघड बये, दार उघड' म्हणत महाराष्ट्राच्या सगळ्या वहिनींना खेळ खेळायला लावणारे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर आता खऱ्या आयुष्यात सासरे होणार आहेत. तर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री सुचित्रा बांदेकर लवकरच सासूबाई म्हणून मिरवताना दिसणार आहेत. त्याचं कारण म्हणजे सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांचा मुलगा आणि अभिनेता सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. राजश्री मराठीने दिलेल्या माहितीनुसार तो एका मराठी अभिनेत्रीसोबत लग्नगाठ बांधणार आहे.