रेवतीचं लग्न झालं म्हणून मुद्दाम पोस्ट केलीस का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर संतापला आदीश वैद्य; म्हणतो- तिला प्रेम मिळालं म्हणून...

Aadish Vaidya Latest Instagram Post: लोकप्रिय मराठी अभिनेता आदीश वैद्य याने एक पोस्ट केली आहे. मात्र त्याचा संबंध आता रेवती लेलेच्या लग्नाशी जोडण्यात येतोय.
adish vaidya react on revati lele wedding

adish vaidya react on revati lele wedding

esakal

Updated on

'रात्रीस खेळ चाले', 'कुंकू टिकली आणि टॅटू', ''बिग बॉस मराठी ३' मध्ये झळकलेला अभिनेता आदिश वैद्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने केलेल्या पोस्ट अभिनेत्री रेवती लेले हिच्याशी जोडण्यात येतायत. त्याचं कारण म्हणजे रेवतीने दोन दिवसांपूर्वीच डिझायनर कौशिक भिडेसोबत लग्नगाठ बांधली. त्यांनी त्यांचे लग्नाचे फोटोही शेअर केले. मात्र कौशिकसोबत लग्न करण्याआधी रेवती आदिशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघे सोशल मीडियावर चर्चेत असायचे. मात्र काही कारणांनी त्यांचा ब्रेकअप झाला. आता रेवतीच्या लग्नाच्या दिवशी आदीशने केलेल्या पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com