
'आई कुठे काय करते' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे. रुपालीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या 'बिग बॉस मराठी' मधील खेळाचंदेखील कौतुक झालेलं. त्यानंतर तिने संजना बनून सगळ्यांना आपलंसं केलं. रुपालीने वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झेलले आहेत. आता रुपाली खऱ्या आयुष्यात दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जातंय. तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तशी चर्चा रंगली आहे.