apurva gore
apurva gore esakal

'आई कुठे काय करते' संपताच अरुंधतीच्या लेकीने सुरू केला नवा व्यवसाय; फोटोत दिसतायत ते लाडू नव्हेत तर...

Apurva Gore New Business: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'आई कुठे काय करते' लवकरच निरोप घेणार आहे. आता अरुंधतीच्या ऑनस्क्रीन लेकीने नवीन बिझनेस सुरू केलाय.
Published on

छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार आता व्यवसाय क्षेत्राकडे वळताना दिसतायत. अभिनयासोबतच ते स्वतःचा वेगळा असा व्यवसाय करताना दिसतात. कुणी स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केलाय तर कुणी दागिन्यांचा व्यवसाय सुरू केलाय. आता या व्यावसायिकांच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतील इशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने स्वतःचा नवा व्यवसाय सुरू केलाय. 'आई कुठे काय करते' ही मालिका गेली पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. आता लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी अपूर्वाने प्रेक्षकांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिने स्वतःचा हटके व्यवसाय सुरू केलाय.

मालिकेत इशाचं पात्र साकारणारी अपूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होण्यास वेळ असला तरी मालिकेचं शूटिंग संपलं आहे. त्यामुळे आता अपूर्वाने नव्या व्यवसायाची घोषणा केलीये. अरुंधतीची लाडकी ईशा आता बिझनेसवुमन झाली आहे. मात्र, अपूर्वाने कपड्यांच्या किंवा हॉटेल क्षेत्रात पदार्पण न करता एक आगळावेगळा व्यवसाय सुरू केला आहे. अपूर्वाने ‘Raahat’ या नावाने कँडल्सचा म्हणजेच मेणबत्ती विकण्याचा बिझनेस सुरू केला आहे. पण, अपूर्वाने बनवलेल्या कँडल्स या साध्या नसून त्या विशिष्टप्रकारे डिझाइन केलेल्या आहेत. मोतीचूर लाडू, फुलांचा आकाराच्या अशा वैविध्यपूर्ण डिझाइन्सच्या कँडल्स तयार करून त्या विकण्याचा हा व्यवसाय आहे.

अपूर्वाने तिच्या नव्या व्यवसायाचं नाव व लोगो असलेली पोस्ट शेअर करत लिहिलं, 'आयुष्यातील कठीण काळात आपल्याला सर्वांना एक सकारात्मक प्रकाश हवा असतो. यासाठी तुम्हा सर्वांबरोबर एक खास गोष्ट शेअर करतेय… तर, हा आहे माझा नवीन ब्रँड ‘Raahat’ By अपूर्वा.' अपूर्वाने यासोबतच मेणबत्यांचा एक फोटो शेअर केलाय. मात्र त्या पाहून हे लाडूचं आहेत असा अनेकांचा गैरसमज होत आहे. तर अनेकांनी तिच्या या नव्या विचाराचं कौतुक केलंय. सोबतच मधुराणी प्रभुलकर, अश्विनी महांगडे, अश्विनी कासार, सीमा घोगळे, गौरी कुलकर्णी यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

apurva gore
कलर्स मराठी काय ऐकत नाय! 'इंद्रायणी' मालिकेत होणार सुपरस्टार अभिनेत्रीची एंट्री; तुम्ही ओळखलं का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com