
Marathi Serial News: छोट्या पडद्यावर सध्या बरीच उलथापालथ पाहायला मिळतेय. झी मराठी, कलर्स मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यांवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. या वाहिन्यांमध्ये टीआरपीची शर्यत पाहायला मिळतेय. टीआरपीमध्ये वाढ होण्यासाठी आता स्टार प्रवाहवर आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची मालिका 'आई बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका दुपारी २. ३० वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे. तर 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ३० नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झालाय. त्यानिमित्ताने सेटवर केकदेखील कापण्यात आलाय. तर प्रेक्षकांची लाडकी अरुंधती मालिकेच्या शेवटच्या दिवशी भावुक झालीये.
'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली. पाच वर्ष प्रेक्षकांनी या मालिकेवर प्रचंड प्रेम केलं. कधी मालिका ट्रोलही झाली. आता मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्यानंतर मधुराणी सेटवर भावुक झाली. यानिमित्ताने राजश्री मराठीशी बोलताना ती म्हणाली, 'खूपच मोठा प्रवास होता. मालिका सुरू होताना हे वाटलं नव्हतं की आपण ५ वर्ष चालणाऱ्या, प्रेक्षकांचं प्रेम मिळणाऱ्या एका प्रोजेक्टचा भाग होतो आहोत. ही ५ वर्ष कशी निघून गेली हे कळलंच नाही. महिन्यातील २०-२२ दिवस आम्ही शूटिंगसाठी सेटवरच असायचो. इतक्या वेगळ्या प्रकारचे सीन केले. अरुंधतीचा ग्राफ, इमोशन्स...त्या भूमिकेचे वेगवेगळे पदर साकारले. त्यामुळे थोडंसं भावुक व्हायला होतंय'
पुढे ती म्हणाली, "प्रेक्षकांचा प्रतिसादही खूप चांगला होता. आपण इथे शूट करत असतो. टीआरपी बघत असतो. त्यामुळे प्रेक्षकांना भेटायची तशी वेळ येत नाही. पण, जेव्हा अरुंधतीच्या नव्या प्रवासावेळी आमची मालिका रंजक वळणावर होती. तेव्हा प्रेक्षक ज्या पद्धतीने येऊन भेटले...आजही प्रेक्षक भेटतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी असतं. ते अरुंधतीमध्ये स्वत:ला बघत असतात. प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारी भूमिका मला टेलिव्हिजनच्या माध्यमातून करायला मिळाली, हे माझं भाग्य आहे".
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.