
मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांची मुलंदेखील आपल्या आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सिनेसृष्टीत करिअर करत आहेत. त्यात काही यशस्वी ठरलेत तर काहींवर फ्लॉपचा शिक्का लागलाय. मात्र असा एक अभिनेता आहे ज्याचा अभिनय चांगला असूनही त्याला आता काम मिळेनासं झालंय. हा अभिनेता आहे लोकप्रिय दिवंगत मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण. वरदने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारून आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता त्याला काम मिळेनासं झालंय. एका मुलाखतीत त्याने त्याची परिस्थिती सांगितलीये.