
आजवर मराठी चित्रपटांमध्ये विविध विषय हे हाताळले गेले आहेत. आता लवकरच तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला 'आंबट शौकीन' हा चित्रपट येत्या १३ जूनला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या नावावरून कथानकाचा अंदाज बांधता येत असला तरी अनेक घडामोडींतून चित्रपटाची मनोरंजक कथा उलगडत जाते. तीन मित्रांच्या भोवती चित्रपटाची रंजक गोष्ट गुंफण्यात आली आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने पहावी अशी प्रत्येक पिढीची रंजक गोष्ट यातून आपल्याला अनुभवता येणार आहे.