
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आजही परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आजही तो त्याच्या अभिनयासाठी प्रचंड मेहनत करताना दिसतो. गेले ४० वर्ष तो अभिनयक्षेत्रात काम करतोय. त्याच्या हिट चित्रपटांची यादी बरीच मोठी आहे. मात्र जितके त्याचे सिनेमे चर्चेत असतात. तितकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. दुसरं लग्न तुटल्यानंतर त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता त्याच्या आयुष्यात तिसऱ्या मुलीची एंट्री झाल्याचं समोर आलंय.