
Entertainment News : दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा नातू तसेच अभिनेता अजिंक्य देव यांचा पुत्र आर्य देव आता दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. त्याच्या दिग्दर्शकीय पदार्पणाची वेबसीरिज ‘गेमरलोग’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने आर्य देव एक तरुण, नव्या विचारांचा दिग्दर्शक म्हणून समोर येत आहे.