बिग बॉस मराठीमधून बाहेर होताच कुठे निघाली आर्या? स्टोरी पोस्ट करत म्हणाली- जग जगू देत नसेल तर...

Aarya Jadhav First Video After Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मधून आर्याची हकालपट्टी करण्यात आली आहे.
aarya jadhav
aarya jadhavesakal
Updated on

'बिग बॉस मराठी ५' सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेत होतं. जान्हवी, निक्की, अंकिता, पंढरीनाथ, सुरज सगळेच एकाहून एक अवलिया या घरात आले आहेत. त्यांना पाहताना सगळ्यांनाच मजा येतेय. मात्र असं असलं तरी आता गेल्या आठवड्यात घरात खूप मोठी गोष्ट घडली. आर्या जाधव हिने टास्कदरम्यान निक्की तांबोळी हिच्या कानशिलात लगावली. त्यामुळे सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला. घरात हिंसाचार करणं नियमभंग असल्याने आर्याला या आठवड्या भाऊच्या धक्क्यावर शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतरआर्याला बिग बॉसचं घर सोडून जावं लागलं. मात्र आता आर्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

आर्याने घराबाहेर होताच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने काळ्या रंगाचं तुटलेलं हृदयाचा ईमोजी शेअर केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी आम्ही तुझ्या सोबत आहोत असं म्हंटलं होतं. त्यानंतर तिने एक स्टोरी शेअर केली होती. त्यात तिने इंस्टाग्राम लाइव्ह सुरू करायचं का असं विचारलं होतं. आता तिने आणखी एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात ती एका गाडीत बसून कुठेतरी जाताना दिसत आहे. ती खिडकीतून बाहेर पाहतेय तर कधी कॅमेराकडे पाहतेय. या व्हिडिओला तिने 'आयुष्य हे' हे गाणं लावलं आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं, 'जग जगू देत नसेल तरी, जगात जागं होतं खूप जरुरी असतं. कधी कधी जसं दिसतं तसं नसतं.'

aarya jadhav
aarya jadhav esakal

या व्हिडिओवरुन आर्या घरी निघाली असल्याचं दिसतंय. तिच्या गाडीत बॅगही दिसतेय. मात्र हा व्हिडिओ पाहून नेटकरी दुखावले आहेत. कुठेतरी अजूनही प्रेक्षकांना आर्य घरात परत येईल अशी आशा होती. मात्र आता आर्याचे बाहेरचे व्हिडिओ पाहून तसं होणार नसल्याचं दिसतंय. त्यामुळे नेटकरी बिग बॉसवर चांगलेच नाराज आहेत.

aarya jadhav
आई झाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाले? दीपिका पादुकोणने चार शब्दात सांगितला अनुभव, बदलला इंस्टाचा बायो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com