
छोट्या पडद्यासह मोठा पडदा आणि रंगभूमी गाजवणारा लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळे याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्याने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्याने अभिनेत्री स्वप्नाली पाटील हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आस्तादने स्वप्नालीने त्याच्या घरातल्यांसाठी केलेल्या गोष्टींसाठी तिचे आभार मानले. आई आजारी असताना आपल्या वाईट काळात स्वप्नालीने त्याला कशी साथ दिली हे त्याने सांगितलंय.