
पती पत्नीचं नातं हे प्रेम आणि विश्वास यावर टिकून असतं. काही कारणाने याच नात्यात कटुता येऊन जोडीदाराच्या खुनाची सुपारी देण्याची वेळ आलेल्या एका नवऱ्याची आणि सुपारी घेणाऱ्या व्यक्तीची उडणारी त्रेधातिरपीट दाखविणारा 'आतली बातमी फुटली’ या आगामी मराठी चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेते मोहन आगाशे यांनी संवादातून आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या देहबोलीतून या टिझरची रंगत वाढवली आहे. केवळ शक्यतांचा अंदाज बांधून खुनाच्या सुपारी भोवती फिरणाऱ्या चित्रपटाच्या टिझरमधून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ असा काहीसा गमतीशीर मामला प्रथमदर्शनी वाटतोय.