
अनेक मराठी कलाकार हिंदी सिनेसृष्टीमधे काम करतात. मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव ते कधीही विसरू शकत नाहीत. तसेच असे काही कलाकार असतात ज्यांना त्यांच्या कामासाठी ओळखलं जातं. अशीच एक अभिनेत्री म्हणजे स्वरांगी मराठे. तिने 'आभाळमाया' या मालिकेत चिंगीची भूमिका साकारली होती. ती उत्तम गायिकादेखील आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्वरांगीने 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.