Abhishek Bachchan: ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटावर अखेर अभिषेक बच्चन बोललाच; म्हणाला- सेलिब्रिटी आहोत म्हणून...

Abhishek Bachchan On Divorce With Aishwarya Rai: अभिषेक बच्चन याने अखेर पत्नी ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल स्पष्ट भाष्य केलं आहे. मी अजूनही विवाहित आहे असं तो म्हणाला आहे.
Abhishek Bachchan
Abhishek Bachchan esakal
Updated on

Abhishek Bachchan Divorce: सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अंबानींचा लग्नसोहळा असो किंवा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ असो, सगळीकडे ऐश्वर्या आणि अभिषेक हे वेगवेगळे जात असल्याने चाहत्यांनी त्यांच्या घटस्फोटाचा अंदाज लावला आहे. त्यात अभिषेकने घटस्फोटाबद्दल लाइक केलेल्या पोस्टने या चर्चांना आणखीनच हवा दिली. त्यात हद्द तेव्हा झाली जेव्हा कुणीतरी त्यांच्या घटस्फोटाला दुजोरा देतानाचा अभिषेकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर अभिषेकने उत्तर दिलं आहे.

आम्ही सेलिब्रिटी आहोत

अभिषेकने बॉलिवूड युकेमीडियाला दिलेल्या मुलाखतीत आपली लग्नातली अंगठी दाखवत घटस्फोटाच्या बातम्यांचं खंडन केलं आणि आपण अजूनही विवाहीत असल्याचं सांगितलं. या मुलाखतीत बोलताना अभिषेक म्हणाला, 'त्याबद्दल सांगायला माझ्याकडे आता काहीही नाहीये. तुम्ही सगळ्यांनीच या सगळ्या गोष्टी खूप वाढवून सांगितल्या आहेत. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मला माहितीये तुम्ही असं का करता. तुम्हाला काहीतरी कथा रचायच्या असतात. काहीतरी कहाणी सांगायची असते. हे ठीक आहे की आम्ही सेलिब्रिटी आहोत, आम्हाला हे सगळं स्वीकार केलं पाहिजे. पण म्हणुन इतकंही अति करायचं नसतं.'

अभिषेकच्या कामाबद्दल सांगायचं तर तो शेवटचा 'घुमर' या चित्रपटात दिसला होता. आता तो शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान यांच्यासोबत एका चित्रपटात दिसणार आहे. तर यासोबतच तो रेमो डिसुझा याच्या 'बी हॅप्पी' या चित्रपटातही दिसणार आहे. सोबत त्याच्याकडे शुजीत सरकारचा आगामी चित्रपटदेखील आहे.

Abhishek Bachchan
Mrinal Kulkarni: लग्न म्हणजे नेमकं काय असतं? मृणाल कुलकर्णींनी सोप्या शब्दात सांगितलं, म्हणतात- आताची जोडपी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com