
'बिग बॉस मराठी ५' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. सुरुवातीला खलनायिकेसारख्या वागणाऱ्या जान्हवीने शो संपेपर्यंत तिची चांगली बाजूही प्रेक्षकांना दाखवली. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली जान्हवी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आजारपणाबद्दल सांगितलं आहे. तिचा मुलगा लहान असतानाच तिच्यासोबत ही घटना घडली होती.