
छोटा पडदा आणिमोठा पडदा गाजवणारा लोकप्रिय अभिनेता लवकरच बाबा होणार आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारा हा अभिनेता आहे अभिजीत श्वेतचंद्र. अभिजित 'शुभविवाह', 'नवे लक्ष्य' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तो लवकरच बाबा होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. आता त्याच्या पत्नीचं डोहाळेजेवण पार पडलंय. त्याचा एक व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलाय.