
Bollywood News : नेटफ्लिक्सवरील भव्य ‘रक्त ब्रह्मांड’ या सिरीजमध्ये अली फजल, आदित्य रॉय कपूर आणि समंथा रुथ प्रभू प्रमुख भूमिकेत आहेत. या शोचं दिग्दर्शन ‘तुंबाड’ फेम राहील अनिल बर्वे करत असून निर्मिती राज आणि डी.के. यांनी केली आहे. ‘मिर्झापूर’, ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’सारख्या प्रोजेक्ट्ससाठी ओळखला जाणारा अली या फँटसी ड्रामामधील प्रमुख पात्रांपैकी एक आहे.