
Entertainment News : हिंदी चित्रपटसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने विविध भूमिका साकारल्या आहेत. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तो चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. ‘लगान’, ‘तारे जमीन पर’, ‘पीके’, ‘दंगल’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्याने संवेदनशील विषय हाताळत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता तो पुन्हा एकदा ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या २० जूनला प्रदर्शित होणारा हा चित्रपट के. एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला असून आमिरसोबत अभिनेत्री जेनेलिया डिसूझाही प्रमुख भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात १० विशेष (दिव्यांग) मुलांना मोठी संधी देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खानशी साधलेला खास संवाद...