
Celebrity Interview : हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी या तीन मराठी चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅटट्रिकनंतर लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी ‘मु. पो. बोंबीलवाडी’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. मु. पो. बोंबीलवाडी नावाच्याच नाटकावर बेतलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेते प्रशांत दामले हिटलरची भूमिका साकारीत आहेत. रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करणारे विक्रमादित्य प्रशांत दामले खूप वर्षांनी रुपेरी पडद्यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचीत.