
_ASHISH WARANG DEATH
ESAKAL
लोकप्रिय मराठी अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले असून, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आज, ५ सप्टेंबर रोजी ठाणे येथील वर्तक नगर येथे वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना कावीळ झाली होती, ज्यातून ते पूर्णपणे बरे झाले होते. मात्र आता अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने आता सगळ्यांनाच धक्का बसला आहे.