
मराठीसोबतच बॉलिवूड प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करणारे मराठमोळे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फार कमी वयात या जगाचा निरोप घेतला. लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव घेतलं की त्यांच्या विनोदी चित्रपटांची नावं पटापट आठवतात. 'अशी ही बनवाबनवी', 'हमाल दे धमाल', ' दे दणादण', 'आयत्या घरात घरोबा', 'धजडाकेबाज', 'एक होता विदूषक', 'शुभबोल नाऱ्या', ते अगदी 'पछाडलेला' पर्यंत लक्ष्यामामांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यांनी आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. आता त्याचे सहकलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवी यांनी लक्ष्मीकांत यांच्याबद्दलचा एक भावुक प्रसंग सांगितला आहे.