Chinmay Mandlekar : मुलाच्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांना चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने दिलं उत्तर...

Chinmay Mandlekar : मुलाच्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांना चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने दिलं उत्तर...

मुंबईः सिनेलेखक तथा अभिनेता चिन्मय मांडलेकरला मागे ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. त्याचं कारण होतं त्याच्या मुलाचं नाव. त्यानेच एका मुलाखतीमध्ये मुलाचं नाव जाहीर केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियात त्याच्यासह त्याच्या पत्नीला ट्रोल करण्यात आलं.

चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा मांडलेकर यांनी मुलाच्या नावावरुन होणाऱ्या ट्रोलिंगला उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी जहाँगीर नावाचा उलगडादेखील केलाय. जहाँगीर हे नाव जगतज्जेता या अर्थाने असल्याचं त्यांनी सांगितलं.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नेहा मांडलेकर म्हणतात, आमच्या मुलाचं नाव काय ठेवायचं, याचा पूर्ण अधिकार आम्हाला आहे. त्याचं उत्तरं द्यायला आम्ही बांधिल नाहीत. तरीदेखील काही लोक अज्ञानातून हे ट्रोलिंग करत असतील तर त्यांना याबाबत सांगणं आमचं कर्तव्य आहे.

Chinmay Mandlekar : मुलाच्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांना चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने दिलं उत्तर...
‘प्लॅस्टिक’चा भस्मासूर खाईल ‘कार्बन बजेट’, तापमानवाढ नियंत्रणासाठी निधी कमी पडण्याची भीती

आमच्या मुलाचं जहाँगीर हे नाव पारशी आहे. जेआरडी टाटा यांचं नाव जहाँगीर होतं. टाटा कुटुंब हे आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. परंतु अज्ञानी लोक जाणीवपूर्वक ट्रोल करीत आहे. विशेष म्हणजे काहींनी आम्हाला देश सोडून पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये जायला सांगितलं, असं नेहा यांनी म्हटलंय. जरी मुस्लिम नाव असलं तरी काय फरक पडतो. अनेक मुस्लिम कलाकारांवर आपण भरभरुन प्रेम करतोच की.

Chinmay Mandlekar : मुलाच्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांना चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने दिलं उत्तर...
Candidates Chess: भारताचा गुकेश विजयाची संधी साधणार? आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा निर्णायक टप्प्यात

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या मुलांना सांगत असतो. परंतु तोही अधिकार आता आम्हाला राहिला नसल्याचं दिसून येत आहे. आमच्या मुलाच्या नावावरुन आम्हाला टोकाचं ट्रोल केलं जात आहे. स्वतंत्र भारतात आम्ही काय नावं ठेवली पाहिजेत, हा आमचा अधिकार आहे. आम्ही भारताचे नागरिक असून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असं नेहा मांडलेकर यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com