

Bollywood News : प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज झाला आहे. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘किस किसको प्यार करूं २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, याचा मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. २०१५ मध्ये आलेल्या पहिल्या भागाने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि आता तब्बल दहा वर्षांनंतर त्याचा सिक्वेल रंगतदार कॉमेडी आणि गोंधळाची नवी मेजवानी घेऊन परततो आहे.