
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता रिषभ शेट्टी याच्या 'कांतारा' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटाने प्रेक्षकांना एका वेगळ्या जगात नेलं. त्यानंतर रिषभ शेट्टीने 'कांतारा २' ची घोषणा केली होती. या चित्रपटाचा दमदार टिझर पोस्टर रिलीज करण्यात आला होता. मात्र आता या चित्रपटाच्या सेटवरून वाईट बातमी समोर येतेय. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका कलाकाराचा बुडून मृत्यू झालाय. ब्रेकमध्ये पायात पोहायला गेलेला एक ज्युनिअर आर्टिस्ट पुन्हा परतलाच नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.