

hiren chatterjee
esakal
सिनेसृष्टीत लग्न, अफेअर आणि घटस्फोट या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. अशाच एका बंगाली अभिनेत्याने पत्नीला अंधारात ठेवून दुसरं लग्न केलं आहे. हा अभिनेता भाजप नेतादेखील आहे. अभिनेता हिरेन चॅटर्जी सध्या त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. हिरेन यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी मॉडेल रितिका गिरीसोबत लग्न केलं. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. मात्र काही मिनिटांतच त्यांनी डिलीट केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनलाय. त्यांना १९ वर्षांची मुलगी आहे. याशिवाय त्यांच्या पहिल्या पत्नीने आता त्यांचा घटस्फोट झाला नसल्याने त्यांचं हे लग्न अवैध असल्याचं सांगितलंय. मात्र यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीनेही प्रतिक्रिया दिलीये.