
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यात स्टार प्रवाहवर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकंचु पसंती मिळवली. या मालिकेत निवेदिता सराफ, मंगेश कदम, हरिश दुधाडे, प्रतीक्षा जाधव आदिश वैद्य आणि पालवी कदम हे कलाकार दिसत आहेत. ही मालिका दुपारी प्रसारित होत असली तरी मालिकेला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. मात्र आता या मालिकेला मोठा धक्का बसलाय. आई बाबा रिटायर होत आहेत मालिकेतून या लोकप्रिय अभिनेत्याने एक्झिट घेतली आहे.