

MAYUR KHANDGE MAHIPAT SHIKHARE
ESAKAL
'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेतील अर्जुन आणि सायली यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. मात्र या मालिकेतील इतर कलाकारांनीदेखील प्रेक्षकांची मनं जिंकलीयेत. पूर्णा आजी, प्रतिमा, प्रिया सगळेच आपल्या कामात चोख आहेत. मात्र असं असलं तरी या सगळ्यांवर एक व्यक्ती भारी पडतो तो म्हणजे मालिकेही व्हिलन महीपत शिखरे. मालिकेत अभिनेते मयूर खांडगे महीपतची भूमिका साकारतायत. मयूर यांनी यापूर्वीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलीयेत. मात्र महीपत या पात्राने त्यांना वेगळी लोकप्रियता मिळवून दिलीये. मालिकेतील या रागीट व्हिलनची लव्हस्टोरी मात्र खूप जबरदस्त आहे.