Zee Marathi New Serial : अज्या आला परत ; नव्या मालिकेच्या प्रोमोची होतेय चर्चा

अभिनेता नितीश चव्हाण नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याच्या नवीन मालिकेचा प्रोमो अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला.
Zee Marathi New Serial : अज्या आला परत ; नव्या मालिकेच्या प्रोमोची होतेय चर्चा

झी मराठीवर सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. शिवा आणि पारू या दोन मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहेत.

या प्रोमोमध्ये जेजुरीच्या खंडोबाचा जयघोष एक तरुण मंदिरात करत असून तो खंडोबाचे आशीर्वाद घेताना दिसतोय. हा तरुण दुसरा तिसरा कुणी नसून आहे लागीरं झालं जी फेम नितीश चव्हाण. हातात रुद्राक्षाच्या माळा, कपाळाला टिळा, हातात कडा आणि वाढलेले केस या वेगळ्या लूकमध्ये नितीशने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय. 'लाखात एक आमचा दादा' असं या मालिकेचं नाव असून आता या मालिकेचं कथानक काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

पहा प्रोमो:

बऱ्याच काळाने नितीश मालिकेत कमबॅक करतोय. सोशल मीडियावर त्याचा लूक सगळ्यांनाच आवडलाय. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत नितीशचं कौतुक केलं.

नितीशची कारकीर्द

मूळचा साताऱ्याचा असलेला निखिल हा कोरियोग्राफर आहे. कोरियोग्राफी आणि अभिनयाची आवड असतानाच निखिलला झी मराठीवरील लागीर झालं जी या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेतील त्याची आणि शिवानी बावकरची जोडी खूप गाजली. त्यानंतर नितीशने मालिकांमधून ब्रेक घेत काही काळ सिनेमांमध्ये काम केलं. सोयरीक, मजनू, उर्मी, फकाट हे त्याचे सिनेमे खूप गाजले. सोयरीक सिनेमातील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com