
आपल्या मुलाचं निधन डोळ्यांनी पाहण्यासारखं दुःख नाही. हे दुःख एका बॉलिवूड अभिनेत्याला सहन करावं लागलं होतं. त्यानंतर त्याचा देवावरचा विश्वासच उडून गेला होता. अभिनेता आपल्या मुलाच्या जीवनासाठी देवाकडे प्रार्थना करायचा. मात्र मुलाचं निधन झाल्यावर तो पूर्णपणे खचला आणि त्याने देव्हाऱ्यातल्या सगळ्या मुर्त्यांची हटवल्या. एका मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलेलं. हा अभिनेता म्हणजे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन. त्यांनी अनेक चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.