
Bollywood Movie Review : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले हे थोर समाजसुधारक, लेखक, विचारवंत. त्यांनी अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी तसेच स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी क्रांतिकारक पावले उचलली. पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे शस्त्रे हाती देत स्त्री शिक्षणाची ज्योत त्यांनी पेटवली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. त्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. याच महात्मा जोतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनसंघर्षाची गाथा म्हणजे 'फुले' हा हिंदी चित्रपट.