
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बैसरन परिसरात दहशतवाद्यांनी अनेक पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या हल्ल्यात २७ पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळलीये. यात काही पर्यटक हे पुण्यातील आणि मुंबईतील होते. या हल्ल्यात लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी त्यांचा जवळचा मित्र गमावलाय. एक पोस्ट करत त्यांनी त्याची माफी मागितलीये.