Rajkummar Rao: फक्त ३ ० ० रुपये होता राजकुमार रावचा पहिला पगार , विकत घेतली पहिली 'ही' वस्तू ; म्हणाला....

Actor Rajkummar Rao revealed his first salary : अभिनेता राजकुमार रावने त्याच्या पहिल्या पगाराविषयी आणि त्यातून घेतलेल्या गोष्टीविषयी खुलासा केला. काय म्हणाला राजकुमार जाणून घेऊया.
Rajkummar Rao
Rajkummar RaoEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेता राजकुमार राव त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. बॉलिवूडचा सध्याचा आघाडीचा अभिनेता असलेल्या राजकुमार रावच्या घरची परिस्थिती एकेकाळी खूप हलाखीची होती. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजकुमारने खुलासा केला कि ३ ० ० रुपये कमावणं एकेकाळी राजकुमारसाठी मोठी गोष्ट होती आणि त्यातून त्याने किराणा सामान विकत आणलं होतं.

नुकतीच राजकुमारने श्रद्धा कपूरबरोबर स्त्री २ सिनेमाच्या प्रोमोशनसाठी आपका अपना झाकीर या सोनी हिंदी टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याने त्याच्या लहानपणीच्या काही जुन्या आठवणी शेअर केल्या.

Rajkummar Rao
Bigg Boss Marathi Season 5 : "आता तुझ्या लेकराला कोण बघणार ?", जीवलगांशी फोनवर बोलताना सदस्य ढसाढसा रडले

कार्यक्रमात झाकीरने दोन्ही कलाकारांना त्यांच्या पहिल्या पगाराबद्दल विचारलं. त्यांनी त्यांच्या पहिल्या पगारातुन काय विकत घेतलं हे सुद्धा त्यांनी यावेळी उघड केलं. यावेळी राजकुमार रावने त्याची भावूक आठवण शेअर केली.

राजकुमारने त्याच्या शाळेतील दिवसांची आठवण सांगितली. तो म्हणाला,"जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी एका सात वर्षांच्या मुलीला तिच्या घरी डान्स शिकवण्यासाठी जायचो. तिला ट्रेन करण्यासाठी मला ३ ० ० रुपये मिळायचे. त्यावेळी मी खूप खुश होतो कारण माझ्या घरातील आर्थिक परिस्थिती त्यावेळी तितकीशी बरी नव्हती. माझ्या पहिल्या पगारातून मी किराणा सामान विकत घेतलं. सगळं विकत घेल्यावर माझ्याकडे काही पैसे शिल्लक राहिले होते. त्यातून मी देशी तूप विकत घेतलं. त्यावेळी आमच्या घरातील चपात्यांना तूप लावून खाणं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती."

तर श्रद्धाने तिचा पहिला पगार ती युएसमध्ये शिकत असताना मिळाल्याचं सांगितलं. युएसमध्ये शिकत असताना तिला फार कमी पॉकेटमनी तिचे बाबा द्यायचे. त्यावेळी ती एका कॉफी शॉपमध्ये काम करायची. त्यावेळी तिला ४ ० डॉलर रुपये पगार मिळाल्याचं तिने उघड केलं.

राजकुमारचा जन्म १ ९ ८ ४ साली एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. त्याच्या वडिलांचं नाव सत्यप्रकाश यादव आणि आईच नाव कमलेश यादव असं होतं. त्याचे वडील हरियाणा मधील एका गव्हर्मेंट ऑफिसमध्ये काम करायचे. २०१९ मध्ये राजकुमारच्या वडिलांचं निधन झालं तर २०१६ मध्ये राजकुमारने त्याच्या आईला गमावलं.

Rajkummar Rao
Kolkata Nirbhaya Case : "आता तिच्यावर झालेल्या अत्याचाराची काय कारणं द्याल ?" मराठी कलाकारांचा कोलकाता निर्भया कांडावर संतप्त सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com