Ranveer Singh : रणवीरने सोशल मीडियावरून हटवले त्याच्या लग्नाचे फोटो ; चाहत्यांना बसला धक्का

Ranveer Singh removed all wedding photos from his Instagram : अभिनेता रणवीर सिंहने सोशल मीडियावरून त्याच्या आणि दीपिकाच्या लग्नाचे फोटो हटवल्यामुळे तो चर्चेत आला आहे.
Ranveer Singh : रणवीरने सोशल मीडियावरून हटवले त्याच्या लग्नाचे फोटो ; चाहत्यांना बसला धक्का

बॉलिवूडमधील सगळ्यांचं लाडकं कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सतत चर्चेत असतात. दीपिका आणि रणवीर हे लवकरच आई-बाबा होणार असून नुकतंच त्यांच्या बेबीमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या व्हेकेशनची चर्चा सोशल मीडियावर सुरु असतानाच रणवीरच्या सोशल मीडियावरील कृतीने सगळयांचं लक्ष वेधून घेतलं.

रणवीरने मंगळवारी ७ मे ला त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून त्यांच्या लग्नाचे सगळे फोटो काढून टाकले. हे फोटो त्याने डिलीट केले आहेत कि अर्काइव्ह केले आहेत हे मात्र अजून समजू शकलं नाहीये. हे करण्यामागचं कारणही रणवीरने उघड केलं नाहीये.

त्या दोघांचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर त्याने तसेच ठेवले असून २०१८ मध्ये पार पडलेल्या त्यांच्या लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावरून काढून टाकले. आता रणवीरच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फक्त १३३ पोस्ट्स उपलब्ध आहेत.

रणवीरची ही कृती त्याची सोशल मीडिया स्ट्रॅटेजी असावी असं म्हंटलं जातंय. या आधी दीपिकानेही असंच पाऊल उचललं होतं. ३१ डिसेंबर २०२० ला दीपिकाने तिच्या सोशल मीडियावरील सगळ्या पोस्ट काढून टाकल्या होत्या आणि एक ऑडिओ नोट शेअर केली होती ज्यात ती आता चाहत्यांसाठी नवीन काहीतरी घेऊन येणार असल्याचं म्हंटलं होतं. तर काही काळाने दीपिकाने तिच्या लग्नाचे फोटोज परत व्हिजिबल केले होते.

Ranveer Singh : रणवीरने सोशल मीडियावरून हटवले त्याच्या लग्नाचे फोटो ; चाहत्यांना बसला धक्का
Deepika Padukone: 'मॉम टू बी' दीपिका सिंघम अगेनच्या शूटिंगमध्ये व्यस्त; बेबी बंपने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं

रणवीर आणि दीपिकाने फेब्रुवारीला महिन्यात ते दोघेही लवकरच आई-बाबा होणार असल्याचं जाहीर केलं. सप्टेंबर महिन्यामध्ये दीपिकाला बाळ होणार आहे. यानंतर दीपिका फार कमी वेळा कोणत्याही कार्यक्रमात दिसली. त्यांनी शेवटची अंबानी कुटूंबाच्या प्री-वेडींगला एकत्र हजेरी लावली होती.

दीपिका सध्या जास्तीत जास्त वेळ आराम करत असून ती फार कमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तर रणवीरही वेळात वेळ काढून तिच्यासोबत टाइम स्पेंड करताना दिसतोय.

वर्क फ्रंटवर लवकरच दीपिकाचा कल्की २८९८ एडी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात तो अभिनेता प्रभास सोबत स्क्रीन शेअर करणार आहे तर अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. यासोबतच 'सिंघम अगेन' सिनेमात तिचा स्पेशल अपिरिअन्स असणार असून या सिनेमात ती तिच्या नवऱ्यासोबत स्क्रीन शेअर करतेय.

तर रणवीर आदित्य धारच्या आगामी सिनेमात काम करत असून लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरु होईल यासोबतच तो 'डॉन ३' मध्येही काम करतोय.

Ranveer Singh : रणवीरने सोशल मीडियावरून हटवले त्याच्या लग्नाचे फोटो ; चाहत्यांना बसला धक्का
Deepika Padukone and Ranveer Singh: गुडन्यूज दिल्यानंतर दीपवीर एअरपोर्टवर झाले स्पॉट; 'मॉम टू बी' दीपिकाला पाहून पापाराझी म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com