
जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषा आणि त्याचबरोबर जगभरात देखील प्रदर्शित होईल, आणि याच निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची अतुलनीय शौर्यगाथा भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.