Sahil Khan: अभिनेता साहिल खानला जामीन मंजूर; कोर्टात दिलं हे कारण, न्यायाधीशही नाही देऊ शकले नकार

Mahadev Betting App Case Sahil Khan Release On Bail: लोकप्रिय अभिनेता सोहेल खान याला आता कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
sahil khan
sahil khan sakal

महादेव बेटिंग अँप प्रकरणी 'स्टाईल' आणि 'एक्सक्यूज मी' फेम अभिनेता साहिल खान याला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. साहिल आता ७० दिवसांनी जामिनावर बाहेर आला आहे. सट्टेबाजी अँपशी संबंधित असल्याच्या आरोपावरून त्याला छत्तीसगढ पोलिसांनी अटक केली होती आणि पुढील तपासासाठी मुंबईला आणण्यात आलं होतं. आता त्याला अखेर जामीन मिळाला आहे. साहिलच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायाधीशही फेटाळू शकलेले नाहीत. वाचा साहिलला कोणत्या कारणाने जामीन देण्यात आला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला मागच्या आठवड्यात जामीन देण्यात आला आहे. न्यायालयाने सांगितलं की साहिलच्या विरोधात प्राथमिक दृष्ट्या कोणताही गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही. साहिलचे वकील रिझवान मर्चंट यांनी बचावात सांगितलं की, केवळ साहिल खानच नाही, तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लायन बुक वेबसाइटची जाहिरात केली, परंतु त्यांच्यापैकी कोणाचेही नाव एफआयआरमध्ये नाही किंवा त्यांना अटकही झालेली नाही. बहुतांश आरोप हे केवळ अनुमानाच्या आधारे करण्यात आले असून त्यांना पुराव्यांचा आधार नाही.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने खान यांनी सादर केलेला युक्तिवाद मान्य केला आणि म्हटले की एफआयआरमध्ये आरोप केलेल्या गुन्ह्यांचा प्रथमदर्शनी खटला स्थापित करण्यासाठी तपास यंत्रणेने अभिनेत्याविरूद्ध कोणतेही ठोस पुरावे गोळा केलेले नाहीत. वृत्तानुसार, अटक टाळण्यासाठी अभिनेत्याने चार दिवसांत पाच राज्यांचा प्रवास केला होता. प्रवासादरम्यान वेश वापरून त्याने आपली ओळख लपवून ठेवली होती, असं सांगितलं जातं. परंतु अखेर 28 एप्रिल रोजी छत्तीसगडमधील जगदलपूर येथील हॉटेलमधून त्याला पकडण्यात आलं.

sahil khan
Nilu Phule: आणि विलासरावांनी जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण निळू फुलेंनी नाकारला; थेट सीएमना दिलेला नकार, कारण फक्त एकच की...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com