
'लग्नाची बेडी मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक स्टार प्रवाहवरील 'दुहेरी' या मालिकेतही झळकला होता. यात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती अभिनेत्री सुपर्णा श्याम. सुपर्णा आणि संकेत यांचं याच मालिकेच्या सेटवर सूत जुळलं. ते प्रेमात पडले आणि २ वर्षांपूर्वी त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र लग्नापूर्वी ५- ६ वर्ष ते एकमेकांना ओळखत होते. तर २ वर्ष ते लिव्ह इनमध्येही राहिले. यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाष्य केलंय.