
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. जुईने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच सोबतच तिच्या साध्या सोज्वळ दिसण्यावरही चाहते फिदा आहेत. सध्या ती टीव्हीवरील टॉपची अभिनेत्री आहे. जुई 'पुढचं पाऊल' या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्यानंतर ती 'ठरलं तर मग' मधून सगळ्यांची मनं जिंकतंय. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा जुई वेगवेगळ्या आजाराने त्रस्त होती. ती एका गंभीर आजाराचाही सामना करत होती. मात्र अशात तिला साथ लाभली ती एका चांगल्या मित्राची. त्यानेच तिला या सगळ्यातुन बाहेर काढलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं.