

Yash Starrer Toxic Movie Sets New Record
esakal
Entertainment News : दा क्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता यशच्या आगामी चित्रपट ‘टॉक्सिक: ए फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. १९ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच तमिळनाडूतील बॉक्स ऑफिसवर मोठा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाचे तमिळनाडूमधील वितरणाचे हक्क तब्बल ६३ कोटी रुपयांच्या अॅडव्हान्सवर, कमिशन बेसिसवर लॉक झाल्याची माहिती समोर आली आहे.