

Marathi Actor Died : 'हिरवं कुंकू' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते योगेश महाजन यांचं काल २० जानेवारी २०२५ रोजी गुजरात येथे निधन झालं. त्यांनी अनखिंडी पौराणिक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांचं रविवारी गुजरात येथील उमरगाव येथे निधन झालं. ते ‘शिव शक्ती-तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी उमरगाव येथे गेले होते. पण तेव्हाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका झाल्याने त्यांचं अकस्मात निधन झालं.