
Marathi Entertainment News : अभिनेत्री दीपा परबने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. २०२३ साली प्रदर्शित झालेल्या बाईपण भारी देवा चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता तर, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’सारख्या प्रभावी चित्रपटातून संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शक म्हणून आपली ठसठशीत ओळख निर्माण केली होती. आता हे दोघं हिंदी चित्रपटसृष्टीत ‘फकिरीयत’ या आगामी सिनेमाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत.