
Entertainment News : मानवी जीवनात अध्यात्माचं स्थान किती खोलवर आहे, हे वेळोवेळी विविध माध्यमांतून अधोरेखित झालं आहे. आता एक नव्या दृष्टीकोनातून, श्री महावतार बाबाजींच्या अध्यात्मिक कार्यावर आधारित ‘फकिरीयत’ हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा अधिकृत पोस्टर नुकताच गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रकाशित करण्यात आला आहे.