
Entertainment News : अभिनेत्री ईशा देओल ही सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका बाजूला ती आपल्या आगामी बॉलिवूड प्रकल्पामुळे चर्चेत आहे, तर दुसऱ्या बाजूला तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडी देखील चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. अलीकडेच ईशा आणि तिचा माजी पती भरत तख्तानी यांचा मुंबई विमानतळावर एकत्रितपणे स्पॉट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.