
मराठी मालिका विश्वातील अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. त्यातच झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. मालिकेतील सावली आणि सारंग आता एकमेकांच्या जवळ येताना दाखवण्यात येत आहे. त्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांची अमृता वहिनी प्रयत्न करताना दिसतायत. मालिकेत अभिनेत्री मानसी नाईक अमृता वाहिनीची भूमिका साकारतेय. मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कुणाला ठाऊक नाही. मानसीचा आधी घटस्फोट झाला असून तिने आता दुसरा संसार थाटलाय. तर तिचा पहिला पतीही अभिनेता आहे.